spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तिरोड्यात मुलांच्या ज्ञानाला पंख देणारा ठरला तान्हा पोळा

तिरोडा २६ :- तान्हा पोळा तिरोडा शहरातील डॉ. आंबेडकर वॉर्ड तसेच गौतम बुद्ध वार्ड येथे आयोजित तान्हा पोळा निमित्ताने विशेष उपक्रम राबविण्यात आले.या सणाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.ज्यामुळे त्यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. तान्हा पोळा हा लहान मुलांसाठी विशेष महत्वाचा मानला जातो. दरवर्षी या उपक्रमात पुस्तके वितरित करण्यात या कार्यक्रमाचे आयोजन एका युट्यूब चैनलचे  उपसंपादक तसेच पंचशील बहुउद्देशीय सेवा संस्थेचे अध्यक्ष साजन रामटेके यांनी केले होते.तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर लाकडी बैलांना सजवून मिरवण्याबरोबरच मुलांना शिक्षणाची प्रेरणा देणारा हा प्रयत्न कौतुकास्पद मानला जात आहे. मुलांना शेती,संस्कृती व शिक्षण विषयक ओढी निर्माण व्हावी. मुलांच्या ज्ञानात भर पडावी या हेतूने हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येणार अशी माहिती आयोजक साजन रामटेके यांनी दिली. या उपक्रमाला स्थानिक पालक व मुले उपस्थित होते तसेच हा उपक्रम पुढील वर्षी सुरू ठेवावे अशी मागणी वार्डातील नागरिकांनी केली

Popular Articles