अमरदिप बडगे, गोंदिया २९ : गोंदियातिल एका गणेश भक्ताने गाईच्या शेणा पासून श्री गणेशाची मूर्ती तयार करीत स्वतःच्या घरी गणेश चतुर्थी निमित्त स्थापना करीत गौरक्षणाचा आणि गाईच्या शेणाचा महत्व इतरांना पटवून दिले आहे, तर हि मूर्ती विसर्जित केल्या नंतर या मूर्तीत टाकण्यात आलेले फळं झाडांचे बीज नवा जन्म घेत तुम्हाला वृक्ष रुपी श्री गणेशाची आठवण करून देत पर्यावरणाचा समतोल राखण्यास सदैव मदत करणार आहे .तर नुकतंच यावर्षी राज्य सरकारने गणेश उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देत पर्यावरण पूरक गणेश मुर्त्या तयार करून स्थापना करण्याच्या सूचना मूर्तिकारांना आणि गणेश भक्तांना दिल्या असल्याने गोंदिया शहराला लागून असलेल्या चुटिया गावातील लक्ष्मी गौशाळेच्या संचालिका प्रिती टेंभरे यांनी गौरक्षणाचा ध्यास घेत आणि गाईच्या शेणाचे महत्व पटवून देण्यासाठी गाईच्या शेणा पासून स्वतःच्या हाताने श्री गणेशाची मूर्ती तयार करीत स्थापना केली आहे तर या आधी सुद्धा प्रिती टेंभरे यांनी त्यांच्या कळे असलेल्या गाईच्या शेणा पासून अगरबत्ती,धूप ,राखी ,श्री गणेशाची मूर्ती आणि इतर शोभेच्या वस्तू तयार करीत गाईच्या शेणाचे महत्व पटवून दिले आहे .त्यामुळे मातीच्या तसेच पॅलस्टार आफ प्यारीसच्या मुर्त्या घडवून घेण्यापेक्षा गाईच्या शेणापासून तयार केलेल्या सीड्स युक्त मुर्त्या स्थापित करून गौ रक्षणा सोबत गाईच्या शेणाचे महत्व पटवून देत गणेश उत्सव साजरा करण्याचा सला टेंभरे कुटूंबियांनी गणेश भक्तांना दिला आहे.
Home Latest News गाईच्या शेणापासून श्री गणेशाची मूर्ती तयार करीत प्रिती टेंभरे यांनी बाप्पाची केली...



