यवतमाळ 1: मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत राळेगाव तालुक्यातील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम क्रमांक मिळवला असून तीन लाख रुपये बक्षीसाचा धनादेश नुकताच शाळेला प्राप्त झाला आहेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन 2024-25 मागील सत्रामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये राळेगाव तालुक्यातून न्यू इंग्लिश हायस्कूलला प्रथम क्रमांक मिळवला असून तीन लाख रुपयाचे बक्षीस शाळेला मिळाले आहेत या स्पर्धेत राळेगाव तालुक्यात प्रथम क्रमांकावर आल्याने पुढील टप्प्यासाठी ही शाळा जिल्हास्तरावर पात्र ठरली आहेत न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ही तालुक्याची शाळा असून शाळेमध्ये 1700 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळेत 50 लोकांचा प्रशिक्षित शिक्षक वर्ग आहेत शाळेमध्ये केवळ राळेगाव तालुक्यातून नाहीतर आजूबाजूच्या तालुक्यातून सुद्धा विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात शाळेचा यावर्षी दहावीचा निकाल 95 टक्के लागला असून गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना आऊट ऑफ मार्क्स मिळाले आहेत तसेच बारावीचा निकाल सुद्धा 91 टक्के लागला आहेत केवळ शिक्षणातच नाही तर क्रीडा आणि सांस्कृतिक विभागा मध्ये सुद्धा शाळेतील विद्यार्थी घवघवीत यश मिळवतात शाळेमध्ये राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना,हरित सेना आदी विभाग कार्यरत असून यामध्ये सुद्धा विद्यार्थी जिल्हा तसेच राज्यस्तरावरील कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात शाळेचा परिसर विस्तीर्ण असल्याने शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्व कलागुणांना वाव मिळतो शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत शाळेला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष बी के धर्मे सचिव डॉ. अर्चना धर्मे संस्थेचे सर्व संचालक मुख्याध्यापक विजय कचरे उपमुख्याध्यापक सुरेश कोवे पर्यवेक्षक सूचित बेहरे, सर्व शिक्षक, शिक्षिका या सर्व कर्मचाऱ्यासह विद्यार्थ्यांचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहेत
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत न्यू इंग्लिश हायस्कूल ला प्रथम क्रमांक.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



