spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गरीब, शेतकरी, युवा आणि महिलांना सशक्त बनवणारा अर्थसंकल्प – ॲड. धर्मपाल मेश्राम

नागपूर :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संत रविदासजी यांच्या जयंतीदिनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प गरीब, शेतकरी, युवा आणि महिलांना सशक्त बनवण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल आहे.

या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, युवा, महिला, विद्यार्थ्यांपासून ते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक, तरुण व्यावसायिक या सर्वांच्या सर्वसमावेशक विकासावर भर देण्यात आला आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. ग्रामीण महिलांच्या नेतृत्वाखालील उद्योगांसाठी ‘शी मार्ट्स’ सुरु केले जाणार आहेत.

अर्थसंकल्पात अनुसूचित जाती आणि आणि जमातीच्या निधीमध्ये 1 लाख 96 हजार कोटी आणि 1 लखल 41 हजार कोटी अशी सन्मानजनक भरीव वाढ करण्यात आली आहे. ‘नमस्ते’ योजनेमुळे सफाईकाम करणाऱ्या मजुरांच्या कामाला न्याय मिळणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्‍या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. हस्तकलांना प्रोत्साहन देण्यासाठी मेगा टेक्स्टाईल पार्क्सची स्थापना आणि महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपारिक कलांचा सन्मान होणार आहे.

– ॲड. धर्मपाल मेश्राम, प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी

Popular Articles