spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महिलांच्या प्रगतीचा उत्सव: रनाळा इथे महिला दिन जल्लोषात

कामठी :- जागतिक महिला दिनानिमित्त रनाळा येथे वत्सल्य पब्लिक स्कूलच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम संचालिका स्वाती पंकज साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप महिला आघाडी नागपूर जिल्ह्याच्या अध्यक्षा डॉ प्रिती मानमोडे होत्या. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून महिलांना आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन केले व समाजातील महिलांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नेहा राऊत (अध्यक्षा, महिला आघाडी भाजप कामठी तालुका), विमल साबळे (माजी उपसभापती व सरपंच, रनाळा), प्रेमलता दीदी (संचालिका, ब्रह्माकुमारी विश्व विद्यालय, रनाळा), प्रांजल वाघ (अध्यक्षा, संजय गांधी निर्धार समिती कामठी), करुणा रडके, आरती चिकटे (सरपंच, तरोडी), भावना फलके(सरपंच, भिलगाव), योगिता धांडे (सरपंच, खैरी), वैशाली मानवटकर (माजी नगरसेविका), सुवर्णा साबळे माजी सरपंच रनाळा, आरती कुल्लारकर माजी उपसरपंच रनाळा,लतेश्वरी काळे (ग्रामपंचायत सदस्य, भिलगाव), रजनी भनारे (महामंत्री, भाजप कामठी तालुका), रंजना काळे उपाध्यक्ष नगरपंचायत येरखेडा,मंगला करेमोरे माजी सरपंच येरखेडा,चेतन बावणकुळे,कोमल काळे,अश्विनी फुकटे, येरखेडा नगरपंचायात चे सर्व महिला नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.

परीक्षक महनून ईशा पारशिवणकर,रुपाली तिचकुले व वर्षा बिरथरे यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली

तसेच अनिता नवले प्रतिभा माकडे, सविता माकडे, खुशबू माकडे, मनीषा कापसे, सरोज धाकोळे, शोभना ढांगे, सुनीता नंदेश्वर, भारती नवले, अंकिता तालेकर (उपसरपंच, रनाळा), अर्चना ठाकरे , स्मिथ भोयर , अर्चना सपाटे,भारती नवले, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वत्सल्य पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले. अनंता हेमके, खुशबू अग्रवाल, हर्षा निम्बाळकर, वीणा नायडू, स्वाती कवळे, पूजा पाखमोदे, सिमरन झा, रीता चरबे, वैदेही बावणकर, नारोत्तम धवाड, रोशनी, शालू, ज्ञानेश्वरी व वर्षा यांचा यात सहभाग होता.गावतील सर्व आशा वर्कर, सीआरपी सारिका चांदरिकापुरे,पूनम सहारे,प्रिया मेश्राम,अशा गॅनर,तृप्ती धोटे ,वर्षा झंझाड,अर्चना साहरे,कविता झलके,अलका ढोके

कार्यक्रमाचे संचालन मिनी झा व नम्रता अढाऊ यांनी प्रभावीपणे केले व आभार हे पंकज साबळे सरपंच रनाळा यांनी मानले.

Popular Articles