spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आजनगाव येथे आज मंडई निमित्य लावणी कलावंत मयुरी उतेकर यांची रंगतदार भव्य लावणी नृत्यविष्कार

किशोर साहू, मौदा ,ता.२४:- दरवर्षीप्रमाणे यंदा तेराव्या वर्षीही गट ग्रामपंचायत आजनगाव सरपंच चिंतामण सारवे व भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे दिवाळीनिमित्त आज शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबरला सायं. सात वाजता सुप्रसिद्ध लावणी कलावंत मयुरी उतेकर यांची रंगतदार भव्य लावणी नृत्यविष्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्घाटक माजी आमदार टेकचंद सावरकर , प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच चिंतामण सारवे सह तालुक्यातील, जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी या लावणी नृत्यविष्काराचा लाभ घेण्याचे आव्हान सरपंच चिंतामन सारवे सह भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.

Popular Articles