spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वीकेंड साजरा करण्यासाठी स्वगृही आलेल्या साडे भाटव्याचा चारचाकी पलटून अपघात

खापा, वार्ताहर :- कोच्छी येथून खापा पाटणसावंगी मार्गे नागपूरच्या दिशेने जात असतांना गुमगाव मॉयल येथील बस थांबा जवळ पलटून अपघात झाला. नवनिर्मित एका दिनाच्या टपरी दुकानाला चार चाकीची जोरदार धडक झाली. घटना गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर रविवार रोजी रात्री दहा वाजता दरम्यान घडली. वाहन चालक व मालक राहुल गजानन जांभुळकर राहणार कोच्ची तालुका सावनेर हल्ली मुक्काम झिंगाबाई टाकळी नागपूर व जावई मधुसूधन श्रीरंग टेंभुर्णीकर रा. नागपूर राहणार हे किरकोळ जखमी झाले.

विकेंड साजरा करण्याकरिता कोच्छी येथे स्वगावी आलेल्या राहुल आणि त्यांचे जावई श्रीरंग हे कोच्छी येथून दहा वाजता दरम्यान जेवण करून नागपूरला राहत्या घरी जाण्यासाठी निघाले. त्यांची चारचाकी सव्वा दहा वाजता दरम्यान वाहन क्रमांक एम एच 31 एफ एच 6619 अतिशय वेगाने भरधाव असल्याने समोर येत असलेल्या एका दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्न करीत असताना राहुल यांचा चार चाकीवरील ताबा सुटला आणि घटनास्थळावर चार पलटी मारून विरुद्ध दिशेने असलेल्या एका टीनाच्या नवनिर्मित बंद टपरीला जाऊन धडकली. पलटी आणि धडक इतकी जोरदार होते की वाहन अक्षरशा क्षतीग्रस्त झाले परंतु चालक राहुल आणि श्रीरंग हे किरकोळ जखमी झाले, असून सुखरूप आहे. स्थानिक लोकांनी त्यांना गाडीचा बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खापा येथे नेले. पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास खापा पोलीस करत आहे. बातमी लिहीपर्यंत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला नव्हता. पुढील तपास खापा पोलिस करीत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.