आश्वासन देऊनही सातबारा कोरा न करणाऱ्या सरकारला घेऊन जागे मार्बत…..

0
55
किशोर साहू :मौदा ,ता. २६: शनिवार (दिनांक 23 )ला तान्हा पोळा निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातील तारसा येथे मार्बत उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मार्बत व बडग्या घेऊन संपूर्ण गावातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. वर्तमानातील ज्वलंत समस्यांचे फलक मार्बत व बडग्या च्या शरीरावर लटकवलेले होते आणि तशा घोषणा देत मिरवणुकीतील उत्साही युवावर्ग गावातून भ्रमण करीत होते. तारसा येथील मार्बत उत्सवानिमित्त तारसा गावाची शान, मारबत उत्सव महान, ईडा पिडा रोगराई घेऊन जागे मार्बत…, सर्दी खोकला, कुत्रा भूकला घेऊन जागे मार्बत…., सातबारा कोरा कोरा कोरा असे फलक लिहिले होते. मात्र काही उत्साही युवक आश्वासन देऊनही सातबारा कोरा न करणाऱ्या सरकारला घेऊन जागे मार्बत…… असे म्हणताना दिसले.