किशोर साहू: मौदा ,ता. २६: दरवर्षीप्रमाणे यंदाही तालुक्यातील गट ग्रामपंचायत पावडदौना अंतर्गत येणाऱ्या पावडदौना, वांजरा, मोहखेडी येथे बालगोपालांचे तान्हा पोळ्यांचे आयोजन करण्यात आले होते.या तिन्हीही गावातील तान्हा पोळ्यात अतिशय उत्साहाने व आनंदाने माता, भागिनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.या उत्सव कार्यक्रमात बाळगोपालांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यावेळी शिवसेना मौदा तालुकाप्रमुख नितेश वांगे यांनी त्यांच्या पत्नी गट ग्रामपंचायतीच्या सरपंचा शीला वांगे आणि नितेश वांगे मित्र परिवारातर्फे शालेय साहित्य आणि खाऊ वाटप केले.
यावेळी ग्रा.पं.सदस्य दशरथ बोम्बाटे,ग्रा.पं.सदस्य निलेश हिरेखन,माजी सदस्या विमल गेडेकार, माजी सदस्य जगदीश बोंबटे ,मुंबई पोलिस अमित भोयर, इंडियन आर्मी सुनील भोयर, अविनाश गिल्लोरकर,बंडू निशाने, निलेश निशाणे,आकाश निशाने,विकास शिंदे, अश्विन शिंदे,आदित्य भोयर, अजय पाटील,कैलास काटवले, बंडू तिवाडे, बाबुलाल काटवले, अतुल खेवले, देविदास भोयर,आशिष (महाराज)गेडेकर,चुडामण बदने, युवासेना पंचायत समिती सर्कल प्रमुख स्वप्नील भोयर, अभिषेक बडे, साजन तिवाडे हे अतिथी आणि मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते.




