spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लोधी समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडविणारे महाअधिवेशन रविवारी नागपुरात

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यासह साक्षी महाराज स्वामी श्रीकंठनंद व राजवीर सिंग (राजू भैय्या) यांचीची उपस्थिती

नागपूर :- लोधी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय विकासाला नवी दिशा देण्यासाठी येत्या रविवारी, ६ सप्टेंबर रोजी नागपुरातील रेशीमबाग परिसरातील कवीवर्य सुरेशभट सभागृहात भव्य लोधी समाज महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय लोधी, लोध, राजपूत कल्याण महासभा तसेच समाजातील विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या अधिवेशनाला महामंडलेश्वर श्री साक्षी महाराज स्वामी श्रीकंठनंद व राजवीर सिंग (राजू भैय्या) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. महाअधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच राष्ट्रीय मागास आयोगाच्या अध्यक्षा साध्वी निरंजन ज्योती यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात लोधी समाजासमोरील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय प्रश्नांवर विचारमंथन करण्यात येणार असून, युवक व महिलांचा सहभाग वाढविणे, शिक्षण-रोजगाराच्या संधी, समाजातील संघटनात्मक एकजूट आणि समाजहिताच्या विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांतून समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने हे महाअधिवेशन लोधी समाजाच्या एकजुटीचे आणि संघटनात्मक शक्तीचे प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे. अखिल भारतीय लोधी राजपूत कल्याण महासभेचे राष्ट्रीय मंत्री राम खरपुरिया लोधी यांनी समाजबांधवांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाअधिवेशन यशस्वी करावे, असे आवाहन केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.