– हजारो भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेण्याचे मंदिर मंडळाचे आवाहन
नागपूर :- आशीर्वाद नगर, गुरुदेव नगर, संत तुकाराम चौक, बँक ऑफ बडोदा यांच्या बाजूला असलेल्या चिंतेश्वर शिवलिंग मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी, सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत हा महाप्रसादाचा आयोजित करण्यात आला आहे. महाप्रसादाच्या निमित्ताने मंदिरात धार्मिक वातावरण निर्माण होणार असून, भाविकांना भगवान शिवशंकर, शंभू भोलेनाथ यांच्या पिंडीचे दर्शन घेऊन आरती व महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे. परिसरातील तसेच आजूबाजूच्या सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन चिंतेश्वर शिवलिंग मंदिर मंडळा च्यावतीने करण्यात आले आहे. चिंतेश्वर शिवलिंग मंदिरात दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या महाप्रसादाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. दरवर्षी जवळपास ८ ते ९ हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. त्यामुळे यंदाही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाविकांनी शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन, आरती आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असेही मंदिर मंडळाने सांगितले आहे. या महाप्रसादाच्या आयोजनामागे परिसरातील नागरिक व भाविकांची धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि भक्तिभाव अधिक दृढ करण्याचा उद्देश आहे. भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने आयोजित करण्यात येणाऱ्या या महाप्रसाद सोहळ्यात सर्वांनी सहभागी होऊन प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. दि. १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत चिंतेश्वर शिवलिंग मंदिर येथे होणाऱ्या या भव्य महाप्रसाद व आरती सोहळ्याला सर्व भाविकांनी आवर्जून उपस्थित राहून भगवान भोलेनाथांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिंतेश्वर शिवलिंग मंदिर मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या आयोजनासाठी चिंतेश्वर शिवलिंग मंदिर मंडळाचे अध्यक्ष इंदु बांते यांच्यासह संजय बोरगावकर, मुरलीधर केवतकर, आशा मिश्रा, विजय बैसवारे, आशिष सोळंके, दिनेश बांते, सिद्धू कोमजवार, राजु काकडे, चंदू साळवे, निशिकांत कडू, प्रणव समर्थ, जाधव पेंटर, प्रमोद पाल, वीरेंद्र पाटील, प्रशांत कोहळे आणि प्रशांत वानखेडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.





