किशोर साहू, मौदा, ता.२:- दरवर्षीप्रमाणे यंदाही तांडा येथे मंडईनिमित्त भव्य आमदंगल व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.आयोजित भव्य आमदंगल व सांस्कृतिक कार्यक्रमाला भाजपा जिल्हा महामंत्री अनिल निधान, भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल, शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत भुरे, कोदामेंढी सर्कल क्लस्टर प्रमुख भगवान बावनकुले, सरपंच तांडा विनोद गभने, नगरसेवक मौदा रमेश कुंभलकर, माजी उपसरपंच तांडा चंद्रशेखर जाधव, भाजपा पदाधिकारी जयराम डोरले, तालुका समन्वय समिती सदस्य अंकित वाडीभस्मे , उपसरपंच गुमथळा योगेश डाफ तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.




