spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन सादर ,उच्च स्तरीय बैठकीची मागणी पुन्हा जोरात

अमरावती :- कोळी महादेव समाजाच्या जात प्रमाणपत्रासह इतर महत्वपूर्ण प्रलंबित मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी ना . फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक बोलविण्यास आपण पुढाकार घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृती समितीचे महासचिव उमेश महादेवराव ढोणे यांनी केली आहे.

या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी व्यस्त कार्यक्रमातून उमेश ढोणे यांना वेळ देत त्यांचे निवेदन स्वीकारले त्या बाबत शिंदे  यांचे आभार मानले.

आपण मुख्यमंत्री असताना या विषयावर बैठक झाली होती; मात्र ठोस निर्णय न झाल्याने प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. परिणामी समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित विभागांच्या उपस्थितीत लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढावा, अशी मागणीही पुन्हा निवेदनातून ढोणे यांनी शिंदे यांच्याकडे केली.

Popular Articles