कामठी शहरातील स्वच्छता व निर्जंतुकीकरण च्या मागणीसाठी मुख्यअधिकारी ला निवेदन सादर

0
56

कामठी :- कामठी शहरातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा पुरविणे हे नगर परिषद प्रशासनाचे मुख्य कर्तव्य आहे मात्र कामठी नगर परिषद प्रशासनाचे शहरातील स्वच्छता व निर्जंन्तुकीकरन कडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरात अस्वछता पसरली असून डासांचा प्रकोप वाढल्याने साथ रोगाचे निमंत्रण देत आहे तेव्हा नागरिकाची आरोग्य विषयक काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून कामठी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने कामठी शहरात स्वछता व निर्जतुकीकरन (फॉगिंग मशीन ने फवारणी) करण्याच्या मागणीचे आशयाचे निवेदन कामठी नगर परिषद चे विरोधी गट नेता व नगरसेवक काशीनाथ प्रधान यांनी मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्याकडे सादर केले.याप्रसंगी लोकसेवक प्रदीप साखरकर,अलंकार गजभिये, सुमित गेडाम आदी उपस्थित होते.

आगामी काळात कामठी शहरात रमजान ईद, रामनवमी,हनुमान जयंती, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती,महावीर जयंती आदी सणोत्सवानिमित्त कामठी शहरात नागरिकाची रेलचेल वाढणार आहे.मात्र कामठी शहरात अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे.विशेषता दुर्गा चौकातील मटण मार्केटमधील कचरा व वाहते सांडपाणी हे हनुमान मंदिर समोरून वाहत जाऊन दुर्गादेवी नगर परिसरात पसरत आहे ज्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.ज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच नाल्यांची नियमित सफाई होत नसल्याची एक मोठी समस्या आहे.तर कामठी नगर परिषद कडे एकमेव फॉगिंग मशीन कार्यक्षम स्थितीत नसल्यामुळे डास नियंत्रण व निर्जतुकीकरण ची कामे प्रभावित होत नाहीत. नागरिकांच्या आरोग्य हितार्थ यापूर्वी सुदधा निवेदित करण्यात आले मात्र यावर कुठलेही ठोस उपाययोजना करण्यात आले नाही याची मात्र परिणामी नागरिकांना संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा निवेदनात उपरोक्त नमूद समस्या असलेले शहरातील सर्व नाल्याची सफाई करणे,मटण मार्केट परिसरातील कचरा व सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे,प्रभावित भागात निर्जन्तुकिकरन करून पावडर चा छिडकाव करणे, फॉगिंग मशीन दुरुस्ती करून नियमित फॉगिंग करणे या बाबीकडे दुर्लक्ष केल्यास नगर परिषद प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल असा ईशारा नगरसेवक काशिनाथ प्रधान यांनी निवेदनातून दिलां आहे.