spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

“एक पेड मा के नाम” वन महोत्सव जि. प. शाळा तोंडली येथे साजरा.

किशोर साहू मौदा ०७ : तालुक्यातील जि प प्राथमिक शाळा तोंडली येथे एक पेड मा के नाम वन महोत्सव उपक्रमांतर्गत सामाजिक वनीकरण नागपूरचे विभागीय वनाधिकारी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रम दि. 2 जुलै  रोजी पार पडला. झाडे आपल्यासाठी तसेच संपूर्ण सजीव सृष्टीसाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन सारखी चांगली सवय मुलांमध्ये लागण्यासाठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावले.  वृक्षारोपणासाठी सामाजिक वनीकरण रामटेक येथून रोपे मिळाली. वृक्षारोपणासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी जितेंद्र ढाले , वनपाल एन एन केंद्रे ,आर आर शुक्ला, वनरक्षक स्वरूप सेंगर यांची प्रमुख उपस्थिती होती.
तोंडली गावचे सरपंच दर्शना बागडे, उपसरपंच रामपाल धांडे, शाळा व्य. समिती अध्यक्ष प्रभाकर तिजारे, माजी उपसरपंच सुरेंद्र बाभरे, जि.प.शाळा तोंडली मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे, सहशिक्षक निलेश जाधव, गावकरी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाडाचे रोपटे देऊन त्याच्या घराच्या परिसरात तसेच शेताच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.वृक्ष लावताना विद्यार्थ्यांच्या आईसोबत फोटो काढण्यात आला. इको क्लब उपक्रमांतर्गत वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Popular Articles