नागपूर ०७ : पीएसएसएम यांच्या वतीने रविवारी ८ .३० वाजता शाकाहारी पायदळ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक अँड. संतोष लांजेवार यांनी केले आहे. शाकाहार विषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगणा टी पाइंट येथून सकाळी 8:30 वाजता. रॅलीला प्रारंभ होईल. अनसूया मंगलकार्यालय, त्रिमूर्तीनगर, नागोबा मंदिर, पडोळे चौक, प्रतापनगर चौक येथून जाऊन छत्रपती नगर चौकात रॅलीचा समारोप होईल. या रॅलीत शहरातील नागरिकांनी स्वंयपूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन अँड. संतोष लांजेवार यांनी केले आहे.







