spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रख्यात सामाजिक नेते बबलू कडवे यांच्या जन्मदिवस कार्यकर्त्या दखल दिवस म्हणून साजरा.

नागपूर ०७ : कार्यकर्ते वाऱ्यावर नेते सत्तेच्या दारावर समाज सर्कलच्या तारेवर हि मन आता प्रचलित होत आहे याला कुठेतरी मुठमाती देण्यात आली पाहिजे यासाठी विविध पक्षात काम करणाऱ्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकजुटीने एक होऊन कार्यकर्त्यांची दखल घेतली पाहिजे असे प्रतिपादन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष नामदेवराव निकोसे यांनी केले ते प्रख्यात सामाजिक नेते बबलू कडवे यांच्या जन्मदिवस कार्यकर्त्या दखल दिवस म्हणून साजरा करताना बोलत होते. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी अँड. मिलिंद खोब्रागडे हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते रवीभाऊ शेंडे, प्रकाश कांबळे, सुखदेवराव मेश्राम, राजु गायकवाड, हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओबीसी नेते राजु दादा पांजरे यांनी केले या प्रसंगी प्रथम सत्कार मुर्ती बबलू कडवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन केले कार्यक्रमात अभिषेक मिश्रा, रोहीत पांडे,सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

Popular Articles