spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ग्राम पंचायत कार्यालय विरसी येथे अतिक्रमणधारकांना पट्टेवाटप कार्यक्रम.

किशोर साहु, मौदा ०७ : तालुक्यातील खात – रेवराल जि प क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत कार्यालय विरसी येथे आज  शनिवार (दि 5 जुलै) ला राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली गावातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख नितेश वांगे, तालुकाध्यक्ष प्रशांत भुरे, भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल, चाचेर मंडळ अध्यक्ष रवी चव्हाण, माजी सभापती स्वप्नील श्रावणकर, मनोज कोठे, माजी जि प सदस्या राधा मुकेश अग्रवाल, सरपंच लक्ष्मी चौधरी, उपसरपंच पंकज वाणी, ग्रामपंचायत सदस्यगण दिनेश मते, श्रीनिवास कोरा, चंद्रकला रमेश चौरे ,माला किसना सोनवाने ,अनिता किसना पारेकर, सारिका भलावी ,तंटामुक्त अध्यक्ष श्रावण सहारे, सचिव सरबत मोहारे, ग्राम रोजगार सेवक, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यकर्ता, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.

Popular Articles