spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी ‘वृत्तपत्र विक्रेता भवन’ उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ : आ. बाळासाहेब मांगुळकर.

 

१० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार.

यवतमाळ ०७ :  ६ जुलैला दु. १ वाजता यवतमाळ जिल्हा वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी संस्थेद्वारा वृत्तपत्र विक्रेता सदस्यांची पाल्य व वृत्तपत्र वितरण करून १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आ. बाळासाहेब मांगुळकर यांचा प्रथम वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे सत्कार करण्यात आले. त्यानंतर १० वी १२ वी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, रजिस्टर व त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दहावी बारावी विद्यार्थ्यांनी भरपूर मेहनत करावी आणि प्रचंड यश संपादन करावे अशा शुभेच्छा दिल्या. तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी संस्थेने जागेची पाहणी करून वृत्तपत्र विक्रेता भवन बांधावे याकरिता आपण आमदारनिधीमधून निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शहर काँग्रेस पक्ष अध्यक्ष प्रा. बबलू देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक शिंदे, उपाध्यक्ष राजू हनवते, म.रा. उपाध्यक्ष संतोष शिरभाते मंचावर उपस्थित होते. यावेळी १० वीचे ११ विद्यार्थी तर १२ वीचे १५ विद्यार्थ्यांना समाजसेवक अमन भाई यांच्याकडून प्रत्येक विद्यार्थ्यांना ६ नग रजिस्टर देण्यात आले. तर शार्दुल ठाकूरकडून पेन पेन्सिल देण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत स्कूल बॅग देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण कोरडे, श्रीराम खत्री, राजु भलावी, मदन केळापुरे, सचिन कदम, प्रवीण आगलावे, किशोर भेदरकर, सुनील बोरकर, तुषार गुजलवार, परीश्रम घेतले. आभार किशोर भेदरकर यांनी मानले. यावेळी कमलनयन कोठारी, श्रीपाद तोटे, राजु काळे, संजय गुजलवार मोठ्या प्रमाणात सदस्यांची उपस्थिती होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.