spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रोडमार्क फाउंडेशन आणि स्वरमेघ आर्ट फाऊंडेशन यांचे संयुक्त अभियान.

नागपूर ०७ : रोड मार्क फाऊंडेशन आणि स्वरमेघ आर्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रोड सुरक्षा अभियाना अंतर्गत अनेक उपक्रमाची रूपरेषा विविध संघटना, सभासद यांच्या सहकार्याने आणि सहभागाने घेण्याची चर्चा करण्यात आली. मानवी चुकांमुळे रस्त्या वरील होणारे अपघात जनजागृतीने कमी करण्याचा प्रयत्न सगळे मिळून करायचे आहे. नियमांचे पालन काटेकोर पणे करण्यात यावे या करिता हे अभियान राबविण्यात येत आहे. या करिता महाराष्ट्र शासनाचा देखील पाठिंबा लाभलेला आहे. या अभियानाच्या नियोजना करिता रोड मार्क फाऊंडेशनचे अध्यक्ष राजू उर्फ राजेश वाघ, स्वरमेघ आर्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष मनीष उपाध्ये, सेक्रेटरी प्रबोध देशपांडे, दिनेश टेकाडे, वानखेडे आदी मान्यवर उपस्थितीत होते.

Popular Articles