spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गडचिरोली पोलीस दलातील शहीद जवानांच्या कुटंुबियांसाठी ‘शहीद सैनिक आश्रित कुटंुब आरोग्य कल्याण योजनेच्या’ नोंदणी शिबिर व वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन.

गडचिरोली पोलीस दल व सहयोग हॉस्पिटल, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आले शिबिर

एकूण 70 शहीद जवानांच्या कटंुबातील सदस्यांची करण्यात आली नोंदणी

एकूण 72 कुटंुबियांची करण्यात आली मोफत वैद्यकीय तपासणी

गडचिरोली ०७ : गडचिरोली जिल्हा हा माओवाददृष्ट अति-संवेदनशिल असून, जिल्ह्रामध्ये माओवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये सुरक्षा दलाचे आजपावेतो एकूण 213 जवान शहीद झालेले आहेत. सर्व शहीद जवानांच्या कुटंुबियांच्या कल्याणाकरिता गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात. याचाच एक भाग म्हणून वीर मरण आलेल्या शहीद जवानांच्या कुटंुबाबद्दल कृतज्ञता तसेच आदर व्यक्त करण्याच्या दृष्टीकोनातून शहीद जवानांच्या कुटंुबातील सदस्यांकरिता गडचिरोली पोलीस दल, पोलीस रुग्णालय, गडचिरोली व सहयोग हॉस्पिटल, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 05 जूलै 2025 रोजी ‘शहीद सैनिक आश्रित कुटंुब आरोग्य कल्याण योजनेच्या’ नोंदणी शिबिराचे आयोजन पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल येथे करण्यात आले.


पोलीस अधीक्षक, गडचिरोली  नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर योजना गडचिरोली जिल्ह्रात राबविली जात असून, सहयोग हॉस्पिटल, गोंदियाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक  जयेशचंद्र रमण रमादे संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या शहीद सैनिक आश्रित कुटंुब आरोग्य कल्याण योजनेच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलातील शहीद जवानांच्या कुटंुबातील आई-वडील, पत्नी व 18 वर्ष वयाखालील पाल्य यांच्याकरिता आपत्कालीन सुविधा, ओपीडी, आयपीडी, शस्त्रक्रिया तसेच रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सर्व वैद्यकिय सुविधांचा लाभ पूर्णपणे मोफत पुरविला जाणार आहेत. सदर नोंदणी शिबिरामध्ये 70 शहीद जवानांचे कुटंुबिय उपस्थित होते. उपस्थित सर्व शहीद जवानांच्या कुटंुबातील सदस्यांची नोंदणी करण्यात आलेली असून, त्यांना सदर योजनेचे नोंदणी प्रमाणपत्र पोलीस अधीक्षक, गडचिरोली  नीलोत्पल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून शहीद जवानांच्या कुटंुबियांना विविध अत्यावश्यक तसेच अत्याधूनिक वैद्यकिय सुविधांचा लाभ मिळणार आहे. रुग्णालयातील कार्डीओलॉजी, न्युरोलॉजी, पॅथॉलॉजी, रेडीओलॉजी यासारख्या विविध अत्याधूनिक विभागांद्वारे शहीद जवानांच्या कुटंुबातील अबालवृद्धांना प्राथमिक वैद्यकिय चाचणीपासून ते अत्याधूनिक शस्त्रक्रियेपर्यंतच्या सर्व सुविधा पुरविल्या जाणार असल्याने त्यांचे जीवनमान सुसह्र होण्यास मदत होणार आहे. तसेच शिबिरादरम्यान उपस्थित सर्व शहीद जवानांच्या कुटंुबातील एकूण 72 सदस्यांची पोलीस रुग्णालय, गडचिरोली व सहयोग हॉस्पिटल, गोंदिया यांच्या वतीने मोफत वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली. सदर कार्यक्रमप्रसंगी पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांनी सांगितले की, “गडचिरोली पोलीस दलाकडून शहीद जवानांच्या कुटंुबियांसाठी यापुढेही अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात येऊन भविष्यात इतर काही रुग्णालयांसोबत देखील शहीद जवानांच्या कुटंुबियांच्या उपचारासाठी सामंजस्य करार करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल प्रयत्नशिल आहे.”

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी पोलीस अधीक्षक  नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  सत्य साई कार्तिक, तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान)  विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस रुग्णालय, गडचिरोलीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.  सुनिल मडावी व त्यांची टीम, सहयोग हॉस्पिटल, गोंदियाचे सहाय्यक व्यवस्थापक (हेल्थ अँड वेलनेस) डॉ.  विश्वेश्वर विरुळकर व त्यांची संपूर्ण टीम  जनसंपर्क शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस कल्याण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली

Popular Articles