spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सुतार समाज महासंघाच्या वतीने चार दशक पूर्ती निमित्ताने कार्यक्रम १३ जुलै रोजी

नागपूर ०७ : महाराष्ट्र विश्वकर्मा मय सुतार (झाडे) समाज महासंघाची स्थापना होऊन 40 वर्षे पूर्ण झालीत. एखादे संघटन स्थापन होऊन चार दशकांची वाटचाल पूर्ण होणे ही त्या समाजासाठी अभिमानाची बाब असते. त्यामुळे या चार दशकपूर्ती निमित्त महासंघाच्या वतीने कविवर्य सुरेशभट सभागृह रेशीमबाग येथे 13 जुलै रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजबांधव प्रल्हादराव नवघरे असून पंढरीनाथ माणूसमारे हे उद्घाटक आहेत. माजी आमदार वनराईचे अध्यक्ष  गिरीश गांधी आणि आमदार प्रवीण दटके या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी महासंघाच्या माजी पदाधिकारी आणि सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिवाय महासंघाच्या 40 वर्षांची वाटचाल दर्शविणारी एक स्मरणिका प्रकाशित करण्यात येईल. यासोबतच दहावी आणि बारावी च्या परीक्षेत 80 टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे. पराग नवलकर अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क बुलढाणा तसेच मोनाली वांढरे, उप अधिक्षक, भूमि अभिलेख यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे, असे महासंघाचे उपाध्यक्ष रत्नाकर पोटे यांनी कळविले आहे.
3 attachments • Scanned by Gmail

Popular Articles