spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बर्फ कारखानदाराकडुन ५० हजारांची खंडणी मागितली

– चाकुचा धाक दाखवुन १० हजार उकळले

– वाघधरेवाडी परिसरातील धक्कादायक घटना ; दोन्ही आरोपी कन्हान पोलिसांच्या ताब्यात

कन्हान :- पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाघधरेवाडी परिसरात बर्फ कारखान्यात घुसून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि चाकुचा धाक दाखवुन १० हजार रुपये ऑनलाइन उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार कल्पेश ईश्वर अहिर वय ३३ वर्ष, रा. रामनगर कन्हान हे त्यांच्या भावाच्या नावा वर असलेल्या तुळजा भवानी बर्फ फॅक्टरीत बर्फ वितर णाचे काम करतात. सोमवार (दि.१७) ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता सुमारास कल्पेश हे कारखान्यात उपस्थित असताना निलेश उर्फ मोगली पात्रे हा एका साथीदारासह कारखान्यात आला. तक्रारीनुसार आरोपींनी कल्पेश यांच्याकडे तातडीने ५० हजार रुपये देण्याची मागणी केली. तसेच दिवाळीत मोठी रक्कम आणि दर महिन्याला ३० हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. कल्पेश यांनी पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर निलेश पात्रे याने कमरेतुन चाकु काढुन त्यांच्या गळ्याला लावल्या चे तक्रारीत नमुद आहे. यावेळी मागितलेले पैसे दिले नाहीत किंवा पोलिसांत तक्रार केली, तर कल्पेश त्यांचे भाऊ व वडिलांना जीवे मारण्याची तसेच पत्नीला त्यांच्या समोरून उचलुन नेण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. चाकुचा धाक दाखविल्यानंतर कल्पेश यांनी आपल्या मोबाईलवरून आरोपीच्या मोबाईल स्कॅनरवर १० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले आहे. या व्यवहाराचा युटीआर क्रमांक ६१२९३३६४९४९४ असुन व्यवहारा मध्ये निलेश विश्वेश्वर पात्रे असे नाव दिसुन आल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय आरोपीने ‘पोलिसांना घाबरत नाही’ असे म्हणत दहशत निर्माण केली तसेच बारमधुन बिअरची बाटली आणण्यास कल्पेश यांना भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेमुळे वाघधरेवाडी व कन्हान परिसरात खळबळ उडाली असुन खंडणीसाठी चाकुचा धाक दाखवुन दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडुन होत आहे. तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या प्रकरणी कन्हान पोलीसांनी कल्पेश आहिर यांच्या तक्रारी वरून निलेश उर्फ मोगली पात्रे व त्याचा साथीदार बॉबी लहानु पात्रे दोन्ही रा. एम.जी. नगर कन्हान यांच्याविरुद्ध कन्हान पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.