spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भरधाव ट्रकने मोपेडला चिरडले; जवाहरनगर परिसरात १७ वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी

– नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील अपघात; अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल

हंसराज, प्रतिनिधी भंडारा जवाहरनगर :- नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर ठाणा पेट्रोल पंप परिसरात एका भरधाव ट्रकने मोपेडला धडक दिल्याने १७ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहेगाव (ता. मौदा, जि. नागपूर) येथील रहिवासी तनु खेमराज मेहर (वय १७ वर्षे) ही मुलगी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आपल्या चेतक कंपनीच्या चार्जिंग मोपेडने (क्रमांक MH 40 DH 3813) ओम सत्य साई विद्यालय, ठाणा पेट्रोल पंप येथे जात होती. यावेळी नागपूरकडून भंडाराच्या दिशेने जाणाऱ्या एका अज्ञात ट्रक चालकाने आपले वाहन भरधाव वेगात, हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवून तनुच्या मोपेडला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात तनु मेहर ही गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी जखमी मुलीचे काका भीमराव भिकाराव मेहर (वय ३६ वर्षे, रा. दहेगाव) यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध अपराध क्रमांक ७९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४ (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. महामार्गावर वाढत्या वेगामुळे होणाऱ्या अपघातांबाबत परिसरातून चिंता व्यक्त केली जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.