spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उमरेड तहसील कार्यालयात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी निवेदन सादर

उमरेड :-  उमरेड तहसील कार्यालयात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे इंजि. सपना राजेंद्र मेश्राम, महिला संघटिका, उमरेड विधानसभा यांच्या नेतृत्वाखाली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपविभागीय अधिकारी विद्यसागर चव्हाण यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषीमंत्री दत्तात्रय बरने यांना देण्यात आले.

निवेदनातील मागण्या पुढीलप्रमाणे आहेत –

1. पूर्ण कर्जमाफी – सर्व शेतकऱ्यांची बँक, सहकारी संस्था व खासगी सावकारांची कर्जे माफ करावीत.

2. तातडीची रोख मदत – प्रत्येक बाधित शेतकऱ्याला हेक्टरी किमान ₹50,000 थेट बँक खात्यात जमा करावी.

3. नुकसानभरपाई – उभी पिके, साठवलेले धान्य, पशुधन, शेतीतील साधनसामग्री, शेतघर यांचे पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी.

4. ओला दुष्काळ जाहीर – अतिवृष्टीग्रस्त भागास ‘ओला दुष्काळ’ घोषित करून विशेष मदत योजना लागू करावी.

5. पायाभूत सुविधा दुरुस्ती – वाहून गेलेले रस्ते, पूल, बंधारे, विजेच्या तारा, पाणीपुरवठा व्यवस्था तातडीने दुरुस्त कराव्यात.

6. शेतमजूर मदत – मजुरीवर जगणाऱ्या कुटुंबांना महिनाभर मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तू पुरवाव्यात.

7. विद्यार्थ्यांना दिलासा – पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची फी शासनाने माफ करावी.

8. वेळबद्ध कृती आराखडा – पंचनामे, मदत वितरण व कर्जमाफीसाठी निश्चित वेळमर्यादा जाहीर करावी.

9. हमीभाव – सोयाबीन व कापूस पिकाला प्रतिक्विंटल किमान ₹10,000 हमीभाव द्यावा.

10. पिक विमा रक्कम – शेतकऱ्यांनी काढलेला विमा थेट खात्यात जमा करण्यात यावा.

11. मासिक सहाय्य – पाच एकर जमीनधारक शेतकऱ्यांना प्रति महिना ₹5000 मदत देण्यात यावी.

या निवेदनाच्या माध्यमातून शेतकरी हा देशाचा कणा असून तोच आज अतिवृष्टीच्या संकटात सापडल्याचे नमूद करत शासनाने तातडीने ठोस पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा कठोर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असे ठाम मत मांडण्यात आले.

निवेदन सादर करताना इंजि. सपना राजेंद्र मेश्राम (महिला संघटिका, उमरेड विधानसभा, शिवसेना – एकनाथ शिंदे गट) प्रमुख भूमिकेत होत्या. त्यांच्यासोबत राजेंद्र मेश्राम. (सामाजिक कार्यकर्ता, शिवसेना) तसेच महेश डडमल, दुर्गा मस्के, दुर्गा वाढई, शैला भावे, कविता जाधव, राणी रंगारी, भारती रामटेके, विशाखा वाघ, तेजस्विनी फुले, शोभा कामठे, संजय रामटेके, सुधीर खडेकर, मुखेश बहादुरे, भैया महाळे, पुष्पा कारगावकर, गीता नारनवरे, वर्षा रंधई, सुरेखा चौधरी, सत्यकुला नारनवरे, कल्पना श्रीरामे, राणुसया श्रीरामे, वंदना नारनवरे, प्रभा नारनवरे, मनीषा तलमले, प्रकाश काटवाले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Popular Articles