हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून शेतक-यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी आपत्कालीन व दिर्घकालीन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या हिताकरीता संभाव्य शेतकरी कर्ज निवारण योजना २०२६ ही योजना तयार केली आहे.
या योजनेत आधार क्रमांक अनिवार्य असल्याने ज्या थकीत शेतकऱ्यांचे आधारकार्ड बँकेमध्ये व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये उपलब्ध झालेले नाही अशा शेतकऱ्यांनी आपले कर्ज निवारण होऊन थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक होण्यासाठी आपले आधारकार्ड व इतर संबंधीत माहिती बँक व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे गटसचिव यांचेकडे जमा करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था शुध्दोधन कांबळे यांनी केले आहे.




