spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘आपली बस’ : एका दिवसात ५०,७१६ डिजिटल तिकीट व्यवहार

नागपूर, ता. २६ : नागपूर महानगरपालिकेची आपली बससेवा ही अधिकाधिक नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरत आहे. प्रवासीसंख्या, डिजिटल पेमेंटचा वापर या मापदंडावर आपली बस नागरिकांच्या पसंतीस पडत आहे. विशेष म्हणजे, ‘आपली बस’ सार्वजनिक वाहतुकीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. २३ जुलै रोजी एकाच दिवसात ५० हजार ७१६ डिजिटल तिकीट व्यवहार नोंदवून ‘आपली बस’ने आतापर्यंतची सर्वाधिक डिजिटल प्रवासी संख्या गाठली आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांच्या नेतृत्वात  व परिवहन व्यवस्थापक  विनोद जाधव यांच्या देखरेखीत मनपाच्या परिवहन विभागाने नागरिकांच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचा परिणाम म्हणून प्रवाशांची देखील आपली बस ला उत्तम साथ मिळत आहे. काही दिवसांपूर्वी  ‘आपली बस’ ने  तब्बल १ लाख ५४ हजार ७२८ प्रवाशांची विक्रमी वाहतूक करून आपला आजवरचा सर्वाधिक प्रवासी वाहतुकीचा विक्रम नोंदवला होता. मनपाच्या परिवहन विभागाने केलेल्या या विक्रमी कामगिरी बद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत यांनी अभिनंदन व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले होते.

त्यानुसार आता या महत्त्वपूर्ण उपलब्धी सार्वजनिक वाहतुकीमध्ये डिजिटल उपायांचा शहरात वाढता स्वीकार दर्शवित आहे. डिजिटल इंडियाच्या संकल्पनेशी जुळवून घेण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. डिजिटल तिकिटांचा वाढता वापर नागपूरच्या सार्वजनिक वाहतुकीच्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांचे यश दर्शवितो. यामुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि अधिक सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळत आहे.

 सर्वाधिक डिजिटल प्रवासी संख्या गाठल्याबद्दल मनपाचे परिवहन व्यवस्थापक  विनोद जाधव, ऑपरेशन व्यवस्थापक  राजीव घाटोळे, कामगार अधिकारी  अरुण पिपरुडे, लेखाधिकारी  समीर परमार,  अंकित चौधरी, तसेच चलो प्रोजेक्टचे प्रमुख  अजय कुमार आणि संपूर्ण चमूच्या उपस्थितीत आनंद साजरा करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.