नागपूर १४ : आसमान फाउंडेशन नागपूर तर्फे पारशिवनी तालुक्यातील भागिमहारी गावात शेतमजूरांच्या शाळकरी मुलांना जॉमेन्ट्रिकल कम्पॉस बॉक्स व मिठाई वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान च्यावतीने संस्थापक डॉ. बबलू गाडवे यांनी केले. याप्रसंगी आसमान फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवि गि-हे, सचिव नरेश शेंडे, कोषाध्यक्ष उषा जैन, आसमान महिला क्रेडिट को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षा मेघा गि-हें उपस्थित होत्या. कार्यक्रमात प्रतिष्ठानच्या मुलांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आदर्शाचे पालन करीत त्यांच्या भजनांची तालासुरात प्रस्तुती केली. या सर्व गरीब व होतकरू मुलांना डॉ गाडवे लहानपणापासून संस्कारित करीत आहेत डॉ. रवि गि-हे यांनी आपल्या संबोधनात संस्कार वर्गाची तारीफ करीत अशा छोट्या गावात मुलांसाठी निःशुल्क संस्कार सेवा उपलब्ध केल्याबद्दल डॉ. बबलू गाडवे यांचे प्रती आभार व्यक्त केले आणि अन्य गांवात सुध्दा असे संस्कार वर्ग सुरू करण्याचे आवाहन केले. यासाठी फाउंडेशन योग्य ते सहकार्य करीत राहिल. आसमान फाउंडेशन दरवर्षी अशा गरीब मुलांना शालेय सामग्री पुरवित असते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन, संचालन व आभार मुलांकडून केले गेले.


