spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी बाबत अनुपालन करण्याचे महालेखाकार कार्यालयाचे आवाहन

नागपूर,दि. ३० : राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीच्या वेळी भविष्य निर्वाह निधी मधील रक्कम प्राधिकृत करण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी भविष्य निर्वाह निधीबाबत नोंद न झालेले क्रेडीट व अग्रीमाचे समायोजन करण्याचे आवाहन, महालेखाकार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्य शासनाचे वर्ग-4 चे कर्मचारी वगळता महालेखाकार (ले. व ह.)-2  कार्यालयाकडे कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीमधील लेखे ठेवले जातात. अशा कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह लेख्यांचे वर्ष 2023-24 करिता वार्षिक विवरण महालेखाकार कार्यालयाच्या http://smswebservicesageamaharashtra२.cag.gov.in/ords/e_portal/r/epensionportal/login या         संकेतस्थळावर तसेच राज्य शासनाच्या  https://sevaarth.mahakosh.gov.in पोर्टल वर अपलोड करण्यात आले आहे. कर्मचारी आपले वार्षिक विवरण व मार्गदर्शीका या संकेतस्थळ व पोर्टलवर पाहु शकतात.

महालेखाकार कार्यालयामधून कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्यात भविष्य निर्वाह निधी लेख्यामध्ये जमा अभिदान तसेच त्यांना दिलेली अग्रीम राशी, भविष्य निर्वाह निधीच्या अंतिम आहारणाच्या आवेदनाची प्राप्ती व प्राधिकृत होण्याबाबतचा मोबाईल संदेश प्राप्त होतो. त्यासाठी  राज्य शासनाच्या 17 मे 2019 च्या अधिसूचनेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना महालेखाकार कार्यालयात मोबाईल क्रमांक नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी मोबाईल क्रमांक नोंदणीकृत केला नसेल त्यांना fm.mh२.ae@cag.gov.in या ई-मेलवर किंवा  पत्राद्वारे संपूर्ण नाव, भविष्य निर्वाह निधी लेखा क्रमांक व सेवार्थ आयडीसह पाठविण्याचे आवाहन महालेखाकार कार्यालयाने केले आहे.

भविष्य निर्वाह निधी विविरणपत्र तसेच सेवार्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांचे नाव व जन्मतारीख तपासून घेण्याचे व त्यात तफावत आढळ्यास सेवार्थ प्रणालीत सुधारित करुन आहरण व संवितरण अधिकाऱ्याद्वारे महालेखाकार कार्यालयास दुरुस्तीसह gpfpakrarngp@gmail.com वर पाठवावा असेही सांगण्यात आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या मासिक अभिदानाची राशी अथवा घेतलेल्या अग्रिम भविष्य निर्वाह निधी लेख्यात नोंद झाली नसल्यास आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या  माध्यमातून कोषागाराकडे पाठविण्याचेही सूचित करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.