spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

घरफोडी व वाहनचोरीप्रकरणी आरोपीला अटक; ८ गुन्ह्यांचा छडा, ३.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त 

 

नागपूर २५ : अजनी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एक मोठी कामगिरी करत घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून तब्बल आठ गुन्ह्यांचा छडा लावला आहे. आरोपीकडून एकूण ३.३३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये एक चारचाकी व सहा दुचाकी वाहनांचा समावेश आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून अजूनही पुढील तपास सुरू आहे.

फिर्यादी मोहन वासुदेव अंबुलकर (वय ४९, रा. प्लॉट नं. २०, विश्वकर्मा नगर, अजनी, नागपूर) यांच्या बहिणीच्या – सौ. अरुणा सुरेश आस्करकर, (वय ६०, रा. रामेश्वरी, अजनी) घरात दिनांक १६ जुलै २०२५ रोजी रात्री ७ वाजल्यापासून ते १८ जुलै २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंत घर बंद असताना चोरट्याने घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. त्याने बेडरूममधील अलमारीतून चांदीचे दागिने आणि घराच्या अंगणात उभी असलेली मारुती सेलेरियो कार क्रमांक एम.एच. ३१ ई.के. ६८१० असा एकूण २.५२ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तांत्रिक तपास करून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे अजनी पोलीसांनी आरोपी आकाश नरेंद्र रामटेके (वय २३ वर्षे, रा. चंद्रमणी नगर, अजनी, नागपूर) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने वरील घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. अधिक तपासात त्याने अजनी पोलीस ठाणे हद्दीत आणखी सहा ठिकाणी दुचाकी चोरी तसेच सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक वाहन चोरी केल्याचे मान्य केले. आरोपीकडून हिरो होंडा डिलक्स (एम.एच. ३१ वि.टी. ४३६), हिरो होंडा स्प्लेंडर (एम.एच. ३१ बि.एस. ५०३२), हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (एम.एच. ३१ ए.डब्ल्यू. ९०९९), हिरो होंडा स्प्लेंडर (एम.एच. ३१ डी.आर. ६९८३), होंडा अ‍ॅक्टीव्हा ५जी (एम.एच. ४९ बी.एल. ६३०७), मारुती सेलेरियो कार (एम.एच. ३१ ई.के. ६८१०) आणि होंडा अ‍ॅक्टीव्हा ४जी (एम.एच. ४९ ए.एच. १२३५) अशी एकूण सात वाहने जप्त करण्यात आली आहेत. याची एकूण किंमत सुमारे ३,३३,०००/- रुपये इतकी आहे.

ही संपूर्ण कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पार पडली. सदर तपास व कार्यवाही पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, पो.उ.नि. सिद्धांत मस्के, पो.ह.वा. ओंकार बाराभाई, पो.अं. नितीन सोमकुंवर, अश्विन सहारे, नरेश श्रावणकर, मनीष भलमे, संतोष नल्लावार आणि महिला पोलीस अंमलदार रेश्मा खान यांनी केली आहे. अजूनही या आरोपीकडून इतर गुन्हे उघड होण्याची शक्यता असून तपास सुरू आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.