spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हातोहात कारवाई! नागपूरच्या गुन्हेशाखेचा चपळ तपास

खुनाच्या अवघ्या काही तासांत आरोपी मुसक्या आवळल्या!

नागपूर  २४ : नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या थरारक खुनानंतर गुन्हेशाखा युनिट क्र. २ च्या पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक करून आपल्या दक्षतेची पुन्हा एकदा छाप सोडली आहे. या वेळी पोलिसांची जलद हालचाल आणि काटेकोर तपास कौतुकास्पद ठरली आहे.२३ जुलै रोजी दुपारी सुमारास, सिव्हील लाईन परिसरातील इंदिरा कॉन्व्हेंट शेजारी असलेल्या कलाकुंज डान्स क्लासेस समोरच्या फुटपाथवर, ४८ वर्षीय माया मदन पसेरकर यांचा त्यांच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून खून करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

मृत महिलेचे पती मदन पसेरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सिताबर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. या भीषण घटनेची माहिती मिळताच गुन्हेशाखा युनिट क्र. २ चे अधिकारी आणि अंमलदारांनी तात्काळ तपास सुरू केला. काही वेळातच या गुन्ह्याचा तपशील समोर आला, जो आणखी धक्कादायक ठरला.तपासादरम्यान समोर आले की, मृत महिलेची मुलगी गीताने प्रेमविवाह केला होता . मुस्तफा खान नावाच्या युवकासोबत. मात्र, मृत महिला आणि तिचा जावई यांच्यात सलोखा नव्हता. याच कारणावरून महिलेने आपल्या मुलीला घरी परत येण्यास सांगितले होते. दरम्यान, गीताने तिच्या पतीकडून ५ लाख रुपये घेऊन आईला दिले होते, जे आरोपीला परत मिळत नव्हते. याच कारणाने संतप्त झालेल्या आरोपीने चक्क चाकू विकत घेऊन माया पसेरकर यांचा पाठलाग करत त्यांच्या गळ्यावर वार करून त्यांचा खून केला.

पोलिसांनी मिळवलेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी हरियाणातील पलवल येथील असून सध्या नागपूरमध्ये गजानन नगर, हिंगणा रोड येथे राहत होता. गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर त्यास ताबडतोब अटक करण्यात आली.या धाडसी आणि वेगवान कारवाईबद्दल पोलिस आयुक्त  रविंद्रकुमार सिंगल यांनी गुन्हेशाखा युनिट क्र. २ च्या टीमला बक्षीस जाहीर करत त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे.  वरील कामगिरी वरिष्ठ अधिकारी (गुन्हे शाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. महेश सागडे, सपोनि. गजानन चांभारे, पोउपनि. मनोज राऊत, पोहवा. राजेश तिवारी, संदीप चंगोले, शैलेष जांभुळकर, नापोअं. सुरेश तेलेवार, पोअं. सुनिल कुंवर, कमलेश गहलोद व मंगल जाधव यांनी पार पाडली. नागपूरकरांनो, गुन्हेगारी कितीही ठरवून केली, तरी नागपूर पोलीसांच्या नजरचुकीतून वाचणं अशक्य आहे — हे या कारवाईतून पुन्हा एकदा सिद्ध झालं!

Popular Articles