spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ कार्यक्रम उत्साहात

नागपूर २४ : कारगिल विजय सप्ताह निमित्ताने प्रहार मिलिटरी स्कूल, रवी नगर येथे ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शौर्य आणि लष्करी जाणिवा जागवण्यासाठी घेण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ब्रिगेडियर सुहास कुलकर्णी (निवृत्त) यांचे विद्यार्थ्यांशी थेट संवाद. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या लष्करी मोहिमांचा संदर्भ देत भारताच्या सर्जिकल क्षमतांबद्दल विद्यार्थ्यांना अत्यंत प्रभावीपणे मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवसमृद्ध संवादातून विद्यार्थ्यांच्या मनात देशसेवेची प्रेरणा जागी झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार मिलिटरी शाळेचे उपाध्यक्ष  भालचंद्र कागभट, एमबीए डिपार्टमेंटचे हेड  भावे सर तसेच मुख्याध्यापिका  वंदना कुलकर्णी यांचीही कार्यक्रमात विशेष उपस्थिती लाभली. मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शिस्त, देशप्रेम आणि जबाबदारीची जाणीव करून दिली. कार्यक्रमाचे संचालन सुसंगत आणि प्रभावी पद्धतीने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या सत्रात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला व उपस्थित मान्यवरांना प्रश्न विचारून संवाद अधिक समृद्ध केला. कारगिल विजय सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केलेला ‘ऑपरेशन सिंदूर’ कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ माहितीपर नव्हे, तर जीवनमूल्यांची प्रेरणा देणारा ठरला.

Popular Articles