spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गळा चिरुन सासूची निर्घुन हत्या

आरोपीत मुलीचाही समावेश

सीताबर्डी हद्दीतील दुपारचा थरार

नागपूर, २४ : शहरातील अतिशय पॉश परिसरात सासूची गळा चिरून निर्घुन हत्या करण्यात आली. पदपथ्ााजवळच ती रक्तबंबाळ अवस्थेत पडून होती. ही थरार घटना बुधवार 23 जुलै रोजी दुपारी पावनेदोन वाजताच्या सुमारास सीताबर्डी ठाण्याच्या हद्दीत आमदार निवासच्या मागच्या परिसरात घडली. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. माया मदन पसेरकर (48) असे मृत महिलेचे नाव आहे. माहिती मिळताच सीताबर्डी पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी रवाना केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पाहणी केली.  याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी मुस्तफा खान मोहम्मद खान (22) आणि त्याची पत्नी गीता (32) रा. आयसी चौक या दोघांना अटक केली.
आमदार निवासच्या मागच्या भागातील झोपडपट्टी परिसरात राहणारी माया ही धुनी भांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची. पती मदन जीयालाल पसेरकर (60) याची ती तिसरी पत्नी होती. पहिली पत्नी सोडून गेली. दुसरीचे निधन झाले. मदनला दुसऱ्या पत्नीपासून दोन मुले आणि एक मुलगी आहे. गीता असे मुलीचे नाव आहे. यापुर्वी गीताचे दोन लग्न झाले असून आरोपी मुस्तफा हा तिसरा पती आहे. पोलिसांनी गीता आणि तिच पतीला अटक केली. सखोल चौकशी केली असता मृतक मायाने गीताच्या लग्नाला विरोध केला होता तसेच पाच लाख रुपये घेतले ते अजूनही परत केले नाही. त्याचा राग होता, त्यामुळे मायाची हत्या केली, असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, हे कारण पटण्यासारखे नाही. कारण गीताचे लग्न दोन वर्षापूर्वीच झाले. हत्या प्रकरणात मुलगी गीताचाही सहभाग असेल, त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.

अशी झाली घटना
त्या घरी माया, तिचा पती आणि दुसऱ्या पत्नीचे दोन मुले असे चार लोक राहायचे. माया अतिशय साध्या स्वभावाची होती. कुणाशी फारशी बोलायची नाही. ती धुनी भांडी करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावायची. नेहमी प्रमाणे बुधवारी सकाळी ती धुनी भांडी करायला गेली. दुपारी 13.40 ते 1.50 वाजताच्या सुमारास घरी जात होती. त्याच वेळी आरोपी मुस्तफा (जावई) तिचा पाठलाग करीत होता. मात्र, आपला कोणी पाठलाग करतोय, याबध्दल मायाला फुसटशीही कल्पना नव्हती. माया घराजवळ आलीच होती. तत्पूर्वी मुस्तफाने  तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. रक्तबंबाळ होताच ती खाली कोसळली. मुस्तफाने पुन्हा मायावर वार करून पळून गेला. ती पदपथाजवळ रक्तबंबाळ अवस्थेत पडून होती.

दोन तासात आरोपी अटक
पाहता पाहता रस्त्याने ये-जा करणाऱ्यांची गर्दी झाली. माहिती मिळताच सीताबर्डी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठलसग राजपूर पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रवाना केला.गुन्हे शाखेचा पथक व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक पथक घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले. दरम्यान सीताबर्डी पोलिसांनी जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक युवक पाठलाग करीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तासाभऱ्यातच आरोपी निष्पन्न केला असून दोन तासात त्याच्या मुसक्या आवळल्या.

Popular Articles