spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत मत्स्यपालन प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ

श्व् दुर्गम भागातील एकूण 30 युवक-युवतींनी घेतले मत्स्यपालनाचे प्रशिक्षण

गडचिरोली २४ : गडचिरोली जिल्ह्यातील शेतक­यांची आर्थिक उन्नती होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या “पोलीस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातून, गडचिरोली जिल्ह्रातील जनतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक, गडचिरोली  नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील माओवादग्रस्त क्षेत्रातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रोजेक्ट उडान अंतर्गत व बिओआय आरसेटी, गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने युवक-युवतींना मत्स्यपालन प्रशिक्षण देण्यात आले. सदरचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाथ्र्यांचा निरोप संमारंभ कार्यक्रम     दि. 21/07/2025 रोजी पोलीस मुख्यालय येथील एकलव्य हॉल येथे पार पडला.

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने मत्स्यपालन प्रशिक्षणामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील 30 प्रशिक्षणाथ्र्यांनी सहभाग घेतला होता. दिनांक 12/07/2025 ते 21/07/2025 पर्यंत एकूण 10 दिवसाचे मत्स्यपालनाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान मत्स्यपालन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व प्रशिक्षणाथ्र्यांना प्रत्येकी एक किलो प्रमाणे मत्स्यबीज वाटप देखील करण्यात आले. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाथ्र्यांचा अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली (प्रशासन)  गोकुल राज जी. यांचे हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली (प्रशासन)  गोकुल राज जी. यांनी सांगितले की, ‘आपण शेतीसोबतच मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, शेळीपालन यासारख्या जोड व्यवसायांना चालना दिली तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल. आज दिले गेलेले मत्स्यबीज हे फक्त सुरुवात आहे. यांचे संगोपन, वाढ व व्यवस्थापन यामुळेच उद्याचा मोठा उद्योजक घडतो. या संधीचे सोने करा आणि एक यशस्वी व प्रेरणादायी शेतकरी उद्योजक म्हणून उभे रहावे.’

सदर निरोप समारंभ पोलीस अधीक्षक, गडचिरोली  नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली (प्रशासन)  गोकुल राज जी. यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आरसेटी गडचिरोलीचे कार्यक्रम समन्वयक  हेमंत मेश्राम हे उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे सर्व प्रभारी अधिकारी व नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.