Wednesday, February 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जलालखेडा हद्दीत मोहाफुल गावठी दारू प्रकरणी ८ आरोपींवर BNS 2023 कलम 112 अंतर्गत कारवाई

जलालखेडा :-  जलालखेडा पोलीसांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, मौजा उमठा (पारधी बेडा), व हिवरमठ, शिवारात मोहाफुल हातभ‌ट्टीची दारू काढल्या जात आहे. अशी माहीती प्राप्त होताच जलालखेडा पोलीसांनी वरीष्ठ पोलीस अधिकारी यांना माहीती देवुन त्यांच्या मार्गदर्शनात नमुद ठिकाणी जावुन कारवाई केली असता आरोपी १) सुरज जितेंद्र पवार, वय २५ वर्ष, आणि महीला आरोपी दोन्ही रा. उमठा (पारधी बेडा) ता. नरखेड यांच्या एक गुन्हा नोंद आहे २) दिनेश रामचंद्र बनसरे, आणि महीला आरोपी दोन्ही रा. उमठा (पारधी बेडा) ता. नरखेड यांच्या एक गुन्हा नोंद आहे. ३) अजय शेरू भोसले, वय २५ वर्ष, आणि माहीला आरोपी दोन्ही रा. उमठा (पारधी बेडा) ता. नरखेड यांच्या एक गुन्हा नोंद आहे. ४) जिगर जगदीश पवार, वय २५ वर्ष, आणि आरोपी गाना शेरील भोसले, वय ३० वर्ष, दोन्ही रा. हिवरमठ ता. नरखेड यांच्या एक गुन्हा नोंद आहे.

नमुद आरोपी हे संघटीतरित्या मोहाफुलाची गावठी तयार करून विकी करतात. पोलीसांनी पंचासमक्ष १) ३५० लिटर मोहाफुल सडवा रसायन, २) २३० लिटर मोहाफुल गावठी दारू ३) एक लोखंडी ड्रम, प्लास्टिक ड्रम इतर साहित्य असा एकुण ३८,२५०/- रूपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने नाशवंत मुद्देमाल मौक्यावर पंचनामा कार्यवाही करून नष्ट करण्यात आला. नमुद आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये ४ गुन्हा नोंदविण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com