पारशिवनी :- पारशिवनी पोलीस अवैध धंदयांवर कारवाई कामी पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी ट्रॅक्टर ट्रॉली शोध कामी सर्तक पेट्रोलींग केली असता मौजा मेहदी ते पिपळा रोड शिवार येथे एक ट्रॅक्टर हे विनाक्रमांकाचे ट्रॉलीसह संशयीतरित्या जाताना दिसुन आले. वाहन थांबवुन पाहणी केली असता ट्रॅक्टर चालक व मालक नामे अभिषेक प्रकाश एकुनकर, वय २६ वर्ष, रा. पिंपळा, वार्ड क्र. ०१, ता. पारशिवनी, जिल्हा नागपूर हा घटनास्थळी मिळुन आला. पोलीसांनी आरोपीच्या वाहनाची तपासणी केली रेती आढळुन आली.
पोलीसांनी पंचासमक्ष ट्रॅक्टर क्र. एम एच-३६/झेड-३२६६ किंमती ३,१०,०००/- रूपये व विनाक्रमांकाचे ट्रॉली किंमती ८०,०००/- रूपये आणि ३०० ते ३५० घमेले रेती किंमती ६,०००/- रूपये असा एकुण किंमती ३,९६,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. नमुद आरोपी याच्या विरूध्द भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ४९ भान्यासं, सहकलम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम चे कलम ४८(७), (८), सहकलम ४, २१ खान खनिज अधि., सहकलम ३ सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






