spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठीत हनुमान जयंती शोभायात्रेच्या नियोजनासाठी प्रशासकीय बैठक 

कामठी :- येत्या श्री हनुमान जयंतीनिमित्त शहरात निघणाऱ्या भव्य शोभायात्रेचे आयोजन यशस्वी आणि सुव्यवस्थित रितीने करण्यासाठी नगर परिषद अध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आज नगर परिषद कार्यालयात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

शोभायात्रेदरम्यान नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी या बैठकीत वीज पुरवठा, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता आणि पाणीपुरवठा या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वीज वितरण विभाग, पोलीस विभाग आणि नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे नियोजन यावेळी केले.

या बैठकीला नगर परिषद मुख्याधिकारी विनोद जाधव, उपाध्यक्ष सबा तौसीब खान, विरोधी गट नेता काशीनाथ प्रधान,सहाययक पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, नवीन कामठी पोलीस निरीक्षक महेश आंधळे, जुने कामठी पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे आणि विद्युत विभागाचे मुख्य अभियंता राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.

तसेच हनुमान जयंती समितीचे अध्यक्ष राजेश शर्मा, नगरसेवक लालसिंग यादव, मूलचंद सिरिया, महेश शर्मा, राजेश खंडेलवाल, सुनील पमनानी, कपिल गायधने, आशू अवस्थी, कुणाल सोलंकी, अथर्व पिंगळे, हितेश बावनकुळे, नितीन रावेकर, आकाश मेश्राम, गिरीश सांगेवार, पीयूष शर्मा यांसह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.

Popular Articles