Home Latest News आरोग्य विभागात कंत्राटी पदभरतीची जाहिरात फसवी,अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन

आरोग्य विभागात कंत्राटी पदभरतीची जाहिरात फसवी,अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन

0
70

यवतमाळ :- यवतमाळ जि. प. सार्वजनिक आरोग्य विभागात कंत्राटी मनुष्यबळभरती सुरू असल्याच्या बातम्या, जाहिराती वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर प्रसिध्द होत आहे. ही दिशाभूल करणारी माहिती असून, नागरिकांनी अफवेपासून सावध राहण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिका-यांनी केले आहे.

अशा चुकीच्या माहितीच्या प्रसारामुळे उमेदवारांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा पदभरतीबाबतच्या जाहिरातीची सत्यता प्रत्यक्ष जि. प. आरोग्य विभागाशी संपर्क साधून पडताळण्यात यावी. फसव्या व खोट्या जाहिरातीमुळे उमेदवारांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नमूद केले आहे.