spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

श्रीराम नवमी ते हनुमान जयंती निमित्य अखंड हरिनाम सप्ताह 

कन्हान :- श्री हनुमान मंदीर देवस्थान टेकाडी व्दारे श्रीराम नवमी ते हनुमान जयंती निमित्त श्री हनुमान मंदीर टेकाडी येथे पहारा भजन मंडळासग अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करून श्री हनुमान जयंती ला दहीकाला व भव्य महाप्रसाद वितरण करून श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

दरवर्षी प्रमाणे श्री हनुमान मंदिर टेकाडी येथे श्रीराम नवमी ते हनुमान जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह गुरूवार (दि.२६) मार्च ते गुरुवार (दि.२) एप्रिल २०२६ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे, त्यापुर्वी बुधवार (दि.२५) मार्च ला सायंकाळी श्री हनुमान मंदीरात पुजा अर्चना करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यात बैलगाडी वर मनमोहक, राम सिता, लक्ष्मण यांची सजीव झाकी, पादुका पालखी, सोबत रामसरोवर अखाडा, हनुमान झाकी, रामरथ, डी जे, बँड व महिला भजन मंडळा सोबत मनमोहक शिव तांडव नुत्य, महाकाल रुप देखिल लोकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले. गुरूवार (दि.२६) मार्च ला सकाळी पासुन रोज २४×७ च्या स्वरुपात नित्य सात दिवस भजनी मंडळांचा पहारा भजनाने अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे.

यात हुड मोहल्ला भजन मंडळ, जय बजरंग भजन मंडळ, जय मा दुर्गा भजन मंडळ, श्री मारोती नंदन भजन मंडळ, आरती गन भजन मंडळ, जय रघुनं दन भजन मंडळ, संत गजानन भजन मंडळ आदि चा समावेश आहे. गुरूवार (दि.२) एप्रिल ला दुपारी १ वा, भव्य महाआरती करुन दंहीहंडी फोडुन दहिकाल्याचा प्रसाद वितरण करण्यात येणार आहे. आणि सायंका ळी ५ वाजता भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास पंचकोशीतील भाविक मंडळीनी बहु संख्येने उपस्थित होऊन श्री हनुमान जन्मोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मंदीर देवस्थान कमेटी टेकाडी व्दारे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता पंढरीजी बाळबुधे, गोपिनाथ गुरधे, मनोज लेकुरवाळे, बंडु इंगळे , जयदेव सातपैसे, नागोराव गोरले, मोतिराम सातपैसे, देवेंद्रसिंग सेंगर, मनोज गुरधे, सुर्यभान कुंभलकर सह समस्थ टेकाडी ग्रामस्थ सहकार्य करित आहे.

Popular Articles