spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ज्योत्स्ना देवधर यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त ‘अक्षर ज्योत’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई :- सुप्रसिद्ध मराठी लेखिका ज्योत्स्ना देवधर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत त्यांच्या अजरामर साहित्याचे सादरीकरण तसेच त्यांच्या आयुष्यावर आधारित निवडक गाण्यांचा ‘अक्षर ज्योत’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

‘अक्षर ज्योत’ सांस्कृतिक कार्यक्रम मेला शुक्रवारी 13 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजता पु. ल. देशपांडे सभागृह, लोकमान्य सेवा संघ (टिळक मंदिर), विलेपार्ले (पूर्व) येथे होणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या कार्यक्रमासाठी पुष्कर श्रोत्री, मधुरा वेलणकर आणि दिप्‍ती भागवत यांच्याकडून अभिवाचन तर गायक नचिकेत देसाई आणि अर्चना गोरे हे निवडक गीते सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा मोडक तर संहिता विकास परांजपे व दुहिता सोमण यांनी तयार केली आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण स्वरवंती क्रिएशन्स यांचे आहे.

या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी रसिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.