spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रेती उत्खनन प्रकरणात फोनवरून धमकीचा आरोप; ऑडिओ क्लिप व्हायरल

– काँग्रेस च्या युवा नेत्याला उडवून टाकू ची धमकी, काँग्रेस च्या युवा नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल…

चंद्रपूर / पोंभुर्णा :- पोंभुर्णा परिसरातील अवैध रेती उत्खननावरील प्रशासनाच्या अलीकडील कारवाईनंतर निर्माण झालेल्या तणावात एक नवीन वळण आले आहे.

काँग्रेसच्या पोंभुर्णा येथील वैभव पिंपळशेंडे या युवा नेत्याला फोनवरून धमकी दिल्याचा कथित आरोप पुढे आला असून, त्याचा एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती मिळत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, व्हायरल क्लिपमधील व्यक्ती स्वतःला ‘शिवा’ असे संबोधत असल्याचे सांगितले जात आहे; मात्र ऑडिओची सत्यता तपासणे बाकी असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणात संबंधित व्यक्तीविरुद्ध FIR नोंदविण्यात आल्याची माहिती अधिकारिक पातळीवरून समोर आली आहे.तर दुसरीकडे पोलिसांनी वैभव पिंपळशेंडे वर ही खंडणी चा गुन्हा दाखल केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. रामनगर पोलीस स्टेशन ला हा गुन्हा दाखल करण्यात आला असून वैभव पिंपळशेंडे ला काल रात्रीच अटक करण्यात आली आहे.

प्रशासनाच्या कारवाईवर नाराजी?

पोंभुर्णा परिसरातील अवैध उत्खननावर झालेल्या अलीकडील कारवाईनंतर काही घटकांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. याच पार्श्वभूमीवर धमकीच्या आरोपांमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात “रेती माफिया सिंडिकेट” सक्रिय असल्याचा आरोप?

स्थानिक लोकांच्या मते, चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती उत्खननाचे कथित सिंडिकेट सक्रिय असून, त्यात काही प्रभावी व्यक्तींचा सहभाग असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातून हजारो ब्रास रेती चा रॉयल्टी न देता दररोज अवैध वाहतूक होत असल्याचा आरोप होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.