spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात?

– उमेदवाराचे भाग्य ईव्हीएम यंत्रात बंद, सरासरी एकूण ६५.३६ टक्के मतदान

– उत्कंठा शिंगेला रामटेकातही निवडणुकीची रणधुमाळी 

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक:- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ५ नगराध्यक्ष आणि ७० नगरसेवक पदासाठी २८ मतदान क्रेंद्र ठेवण्यात आले होते. एकूण ६५.३६ टक्के मतदान किरकोळ बाचाबाची वगळता शांततेत पार पडले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने चौख बंदोबस्त केला होता. तरुणाईसह ज्येष्ठ नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. १० प्रभागामधील २० जागांसाठी नशीब आजमावणाऱ्या ७० उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद झाले आहे. न्यायालयीन आदेशानुसार प्रभाग ०६ मधील सदस्य पदाच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. प्रभाग ०६ मधील निवडणूक दि. २० डिसेंबरला होणार असून संपूर्ण निकाल २१ डिसेंबरला घोषित केल्या जाईल. निकाल तब्बल १९ दिवस लांबणीवर गेल्याने उमेदवाराचे टेन्शन वाढले आहे. कोणत्या १ उमेदवारांच्या गळ्यात नगराध्यक्षाची माळ पडेल. हे निकाल लागल्यानंतर कळणार आहे. सकाळी साडेसात वाजता पासून आज शहरातल्या विविध मतदान केंद्रांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली होती बहुतांश लोक हे सकाळच्या सुमारासच मतदान करून आपापल्या कामाला निघताना दिसले. दरम्यान सकाळी साडेसात ते साडेअकरा वाजता पर्यंत मतदानाची टक्केवारी १४.४७ एवढी तर साडेअकरा ते साडेतीन वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी ४१.७६ पर्यंत पोहोचली. दुपारच्या सुमारास मतदानाचा प्रवाह थोडा मंदावला होता मात्र चार वाजता पासून ते साडेपाच पर्यंत मतदान केंद्रावर पुन्हा लोकांची एकच गर्दी झाली. दरम्यान एकंदरीत सकाळी साडेसात ते दुपारी साडेपाच पर्यंत मतदानाची एकूण टक्केवारी ६५.३६ एवढी राहिली असून एकुण २०५०८ मतदारांपैकी ६७२७ स्त्री मतदारांनी तर ६६७७ पुरुष मतदार मिळून एकुण १३४०४ मतदारांनी नगरपरिषद रामटेक च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रमेश कोळपे यांनी दिली.

उमेदवार व कार्यकर्त्यांची मतदान केंद्रावर लुडबुळ

दि.२ डिसेंबरला येथील विविध मतदान केंद्रावर तुरळक बाचाबाची वगळता शांततेत झाले. सकाळपासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत उमेदवारांसह त्यांचे खास कार्यकर्ते शहरातील विविध मतदान केंद्रांवर लुळबुळ करताना दिसले. केंद्रांवर हजर पोलीस कर्मचारी लुळबुळ करणारे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना फटकारताना पहावयास मिळाले. पोलीस प्रशासनाने मतदानादरम्याने प्रत्येक मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त लावला होता.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.