spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खाप्यात “सखी मतदान केंद्र”; हिरकणी कक्ष आणि सेल्फी पॉईंटची देखील व्यवस्था, लग्न मंडपासारखं वातावरण, कटेकोर पोलीस बंदोबस्त

खापा :- राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. शहारत गुलाबी वातावरणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अध्यक्ष पदासाठी ६, सदस्यांसाठी ५८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मंगळवारी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. या सर्व ठिकाणी एकूण २० मतदान केंद्रांवर एकूण १३३५३ मतदारांमधून एकूण ९२६३ (एकूण मतदारांच्या ६९.३८%) त्यात ४७०६ पुरुष तर ४५५७ महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. खापा नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी अगदी गुलाबी वातावरणात मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. हा मतदान केंद्राला “सखी मतदान केंद्र” असं नाव देण्यात आले.

“काय आहेत वैशिष्ट्य ?”

प्रभाग एक मध्ये असलेल्या सखी मतदान केंद्रावर एकूण 640 मतदार आहेत. यापैकी महिला मतदारांची संख्या 327 इतकी आहे. मतदान केंद्रावर मतदान केंद्र अधिकारी, केंद्राध्यक्ष, पोलीस यांच्यासह सर्व कर्मचारी या महिला होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार स्नेहलता पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी किरण बगडे व प्रशासकीय अधिकारी वैभव गोळे यांच्या कल्पनेतून केंद्राबाहेर फुग्यांचं भलं मोठं प्रवेशद्वार उभारण्यात आले होते. या ठिकाणी मतदान केल्यावर फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंटची व्यवस्था आणि स्तनदा मतांसाठी हिरकणी कक्षाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लहान बाळांसाठी पाळण्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती.

“मतदानाचा टक्का वाढवा”

गुलाबी रंगातलं वातावरण या केंद्रावर आहे. खरं तर मतदार मोठ्या संख्येनं मतदानासाठी यावेत आणि मतदानाचा टक्का वाढवा असा या संकल्पनेमागचा उद्देश आहे.” या ठिकाणी सर्व कर्मचारी हे गुलाबी साडी आपलं कर्तव्य बजावत आल्याची माहिती मतदान केंद्र प्रमुख दीपाली दिलीप सरोदे यांनी दिली. तसेच या केंद्रावर सर्व व्यवस्था अगदी गुलाबी वातावरणातच करण्यात आली होती. जसे गुलाबी रंगाची पाण्याची कॅन, गुलाबी रंगाचे ग्लास, गुलाबी रंगाचे बॅनर, गुलाबी रंगाचीच रांगोळी अशाप्रकारे आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते.

“लग्न मंडपासारखं वातावरण

मतदान केंद्रात मतदानासाठी नव्हे तर जणू आपण एखाद्या लग्नासाठी लग्न मंडपातच आलोय असा भास होत असल्याची प्रतिक्रिया, अनेक मतदारांनी नोंदवली. या ठिकाणी मतदानाचं महत्व सांगणारे माहिती फलकही लक्ष वेधत आहेत.

“बुथवर सकाळपासून उत्साह”

कडाक्याची थंडी असल्यानं सकाळी 7.30 ऐवजी 10 वाजल्यापासून खापा येथे दहा प्रभागात वीस केंद्रांवर मतदारांची गर्दी उसळली. सर्वच ठिकाणी शांततेनं मतदान प्रक्रिया सुरू असून, वृद्ध आणि अपंगांसाठी सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक व्यवस्था करण्यात आली.

“कटेकोर पोलीस बंदोबस्त

शहरात निवडणुकीदरम्यान कसल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात यांच्या आणि ठाणेदार किशोर भुजाडे नेतृत्वात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि कटेकोर बंदोबस्तात निवडणूक शांततेत पार पडली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.