खापा :- महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगर पंचायतसाठी आज काही अपवाद वगळता राज्यभर मतदान झाले. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी विविध मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगाल लागल्या होत्या. पण काही मतदार क्षुल्लक कारणांसाठीही मतदानाकडे पाठ फिरवतात. मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस म्हणत अनेकजण टाळाटाळ करतात. परंतु ६५ वर्षीय वयाच्या एका मतदाराने अशा मतदारांसाठी एक आदर्श निर्माण केलाय. खापा येथील माळीपुरा परिसरातील रहिवासी ६५ वर्षीय निर्मला अरुण टेटे हे व्हिल चेअरवरून मतदान केंद्रात पोहोचले आणि त्यांनी आपला हक्क बजावला. विशेष म्हणजे मागील एक वर्षांपूर्वी झालेल्या अर्धांगवायूने त्यांच्या अर्ध्या शरीराला लकवा आहे. इतकंच नव्हे तर जिवंत आहे तोपर्यंत मतदानाचा हक्क बजावणार असं या आजारी महिलेने ठामपणे सांगितलं आहे.
अर्धांग वायू आजाराने ग्रासलेल्या महिलेने व्हील चेअर वर पोहोचून केले मतदान


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



