खापा :- लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात प्रथमच दुसरी निवडणूक होत आहे. खापा नगर परिषदच्या निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला आहे. माधुरी श्रोते या नववधुनं शुभ मुहूर्तावर लग्न लावून मतदानाचा हक्क बजावला.
खापा शहरात आज लोकशाहीचा उत्सव पार पडला. आज विवाह समारंभाचीही मोठी तिथी होती. त्यामुळं खापा येथील माधुरी नरेंद्र श्रोते या नववधुनं सकाळी शुभ मुहूर्तावर आपले लग्न लावून मतदानाचा हक्क बजावला. तिचा शुभविवाह आज खापा येथील तान्या सेलिब्रेशन लॉन येथे सकाळी साडे दहा वाजता च्या शुभ मुहूर्तावर पार पडला.
“लग्न करून नवरीनी केले मतदान”
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा : लगीन लावून नवरी मतदान केंद्रावर पोहचली होती. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारानं मतदान करण्याचं आवाहन या नवरीनं केलं. या नवरीनं विवाहाच्या कार्यक्रमाचं नियोजन बाजूनं ठेवून आधी मतदान करण्याचा निर्णय घेतल्यानं, नागरिकांनी तिचं स्वागत केलं.
“एक मत मोलाचं”
लग्नसराई देखील सुरू आहे. मात्र लग्नाच्या घाईत नवरी आवर्जुन मतदानासाठी केंद्रावर हजर राहिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना माधुरी श्रोते म्हणाली की, एका मताचं महत्त्व काय असतं हे तिला माहिती आहे. त्यामुळं एक मत किती मोलाचं आहे हे माहीत आहे. म्हणूनच मी आज या ठिकाणी मतदानाला आल्याचं माधुरी श्रोते यांनी सांगते.
देशातील प्रत्येक नागरिकानं आपला मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे. देशात लोकशाही बळकट करायची असेल तर प्रत्येकानं घराबाहेर पडावं आणि मतदान करावं असा संदेश वारंवार अनेकांकडून दिला जातो. दरम्यान आज लग्न लावून नवख्या नवरदेवासोबत मतदान केंद्रावर चक्क नवरी लग्नाची लग्नाच्या साजात नटून पोहोचली आणि उपस्थितांना अचंबित केलं.
“टाळ्यांच्या गजरात नवरीचं स्वागत”
नागपूर जिल्ह्यातील खापा येथील प्रभाग क्रमांक एक मधील सखी मतदान केंद्रावर मतदानासाठी नवरी केंद्रावर पोहोचली. खाप्यात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. श्रोते यांनी खापा येथील नगरपरिषद आदर्श प्राथमिक शाळा मध्ये मतदानाचा हक्क बजावला. केंद्रात जाऊन लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टीनं मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी आलेल्यांनी टाळ्यांच्या गजरात नवरीचं स्वागत केलं.




