Home Latest News कामठी शहराच्या विकासासाठी सदैव तत्पर – अजय अग्रवाल

कामठी शहराच्या विकासासाठी सदैव तत्पर – अजय अग्रवाल

0
44

कामठी :- राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी शहराच्या विकासासाठी तसेच समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी कुठलाही पक्षपात न करता सदैव तत्परता दाखवून कामठी शहराचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलविण्यासाठी कामठी नगर परिषद ला कोटी रुपयाचा निधी दिला आहे. कामठी शहरात मेट्रोचे जाळे विणले जाणार असून कामठी शहर हे मेट्रोचे शहर होणार आहे ज्याचे काम शहरातून प्रगती पथावर असल्याचे दिसून येत आहे. बावनकुळे यांनी कामठी शहराचा विकास हाच एक ध्यास लक्षात घेऊन कुठलाही जातिधर्मभेद, राजकीय मतभेट मनात न आणता कोटी रुपयाच्या निधीतून शहरात विकासाची गंगा खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील भूमिका साकारली आहे.याच पाश्ववरभुमीवर प्रत्येक समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी सदैव तत्पर असणार असल्याचे मनोगत भाजप पदाधिकारी अजय अग्रवाल यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 15 लक्ष रुपयाच्या निधीतून रमानगर रेल्वे क्रॉसिंग मार्गावरील नाग मंदिर विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केले.

हे भूमिपूजन भाजप जिल्हा कोषाध्यक्ष अजय अग्रवाल,भाजप कामठी शहराध्यक्ष मंगेश यादव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले व निधी दिल्याबद्दल बावनकुळे साहेबांचे सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी प्रदेश सचिव कपिल गायधाने,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट, जिल्हा कार्यकर्णी सदस्य राजेश खंडेलवाल, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख आशु अवस्थी, माज़ी युवा मोर्चा अध्यक्ष कुणाल सिलंकी, महामंत्री नरेश डोंगरे उपाध्यक्ष दीपक सीरिया, सुनील पमनानी, सोयम यादव, प्रीतम यादव, राम भरोसे यादव, आतिश यादव, धीरज यादव, चंचल यादव, पंकज यादव, अतुल यादव, हिमांशु गुप्ता, दर्शन यादव, गोलू यादव, सूरज यादव, राहुल शाहू, सोनू यादव एल, सुशांत यादव, नावेल यादव, राज शर्मा, सेंटी रॉकर, मनीष यादव, शतीश यादव, विकल त्रिपाठी, निखिल शर्मा, अक्षय भुरुचे, गोलू त्रिपाठी, उपस्थित होते.