– वेदमंत्राच्या गजरात पार पडले माँ गंगा दशहरा दिप महोत्सव
– प्रवाहित झाल्या लक्षावधी दीपज्योती
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- प्रभु रामचंद्रांच्या पदस्पशनि पावन, विदर्भाची काशी व धार्मिक महत्व असलेल्या रामटेकचे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. येथील अंबाळा तलावाच्या काठावर वसलेले प्राचीन मंदिरे अनेकार्थान भाविकांच्या आस्थेचे केंद्र ठरलेला आहे. याच घाटावर साजरा होणारा माँ गंगा दशहरा दिप महोत्सव भावना उन्मळून टाकणारा असतो. २५ मे ला हा सोहळा पार पडला. यावेळचे दृश्य जणु अंबाळा घाटाला सहस्त्रावधी दिप माळांनी श्रृंगार घातल्यासारखे होते. पाण्यात सोडल्या जाणाऱ्या असंख्य ज्योतींच्या मंद प्रकाशात अंबाळा तलावात नयनरम्य दृष्य तयार झाले. भारतीय जनसेवा मंडळ, माँ गंगा दशहरा दिप महोत्सव समिती, श्री क्षेत्र अंबाळा ब्राह्मवृंद, नागरिक अंबाळा आणि भाविक भक्तांगण यांच्या वतीने अंबाळा तलावाच्या काठावर माँ गंगा दशहरा दिप महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले होते.
रामटेक येथे अगस्ती आश्रमातील अखंड ज्योतीला दुसरी ज्योत पेटवून जैन मंदिर, बर्वे स्कुल, झेंडा चौक, गांधी चौक, लंबे हनुमान मंदीर या मार्गान अंबाळा तलावाच्या काठावर आणली. या ज्योतीचे वाजत गाजत स्वागत करण्यात आले. येथे उपस्थित ब्रम्हवृंदाकडुन वैदिक मंत्रोच्चारात तलावाच्या पाण्याचे विधीवत पूजन करण्यात आले. यानंतर गंगेची महाआरती करण्यात आली. त्यानंतर हजारो नागरिकांनी आपल्या सोबत आणलेले दीप तलावात सोडले. तलावात तरंगणारे दीप जणु आकाशातील तारकासमुह रामटेकच्या भेटीला जमिनीवर उतरल्याचा भास होत होता. या तलावात गंगा यमुना नदीचे पाणी पवित्र पाणी वास करते अशी भाविकांची श्रद्धा आहे. अगस्ती आश्रमातील संत दिवंगत गोपाल बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव दरवर्षी भक्तीभावपुर्ण वातावरणात साजरा केला जात होता. तीच परंपरा भारतीय जनसेवा मंडळाने कायम ठेवली आहे.
प्रामुख्याने उपस्थित मान्यवर
यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने ज्ञानीदास महाराज, कैलासपुरी महाराज, विष्णुगिरी महाराज भारतीय जनसेवा मंडळचे महासचिव माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन , उपाध्यक्ष आलोक मानकर, नगरसेवक, सहसचिव सुभाष बघेले, शेखर बघेले, विनायक डांगरे, ऋषीकेश किंमतकर, राहुल धनकर, सुशिल पडोळे, अरुण चौक, सुभाष मुळे, प्रशांत धनकर, अमोल मठकर, अजय जोशी, अनिल संगीतराय, रवि ठाकरे, धर्मेश नागपुरे, दिलीप रेवतकर, हुकुमचंद बड़वाईक, मोहन कोठेकर, हर्षल कामडे, मोनू रघुवंशी, योगेश सांडीलकर, लक्ष्मीकांत संगीतराय, राहुल कोठेकर, बालचंद खोड़े, अंबाळा येथील ब्राह्मण वृंद सहित आदि नी प्रयत्न केले.
भारतीय जनसेवा मंडळाचे पदाधिकारी व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.