spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वन विभागाची कारवाई ; अवैद्य रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त

◼️तीन आरोपी विरुद्ध वन गुन्हा दाखल

सचिन चौरसिया,रामटेक :- तालुक्यातील पवनी (प्रादेशिक) वनपरिक्षेत्रातील अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन ट्रॅक्टर पकडून भारतीय वन अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले असून ही कारवाई (दि.२३) मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली. पवनी ( प्रादेशिक) वनपरिक्षेत्रातील संरक्षित वन कक्ष क्रमांक २६७ मध्ये अवैद्य रीती उपसा व वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती वनविभागाला प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक वनरक्षक गोविंद लुचे यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने तात्काळ सापळा रचून धाड टाकली. कारवाईदरम्यान ट्रॅक्टर क्रमांक एमएच ४० बीजे ८१७१ व एमएच ४० सी क्यु ७१९१ अवैद्य रेतीची वाहतूक करताना आढळून आला. वनपथकाने तात्काळ दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेत सुरेश धन्ना भलवे रा.सावंगी, नंदू राकेश सोनवणे रा. पवनी व राजा शेपराव धुर्वे रा. सावंगी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभाग सतत गस्त व ग्रामस्थांनी जंगल संवर्धनासाठी सहकार्य करावे, रात्रीच्या वेळी जंगलात जाणे टाळावे व कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास वनपरिक्षेत्र कार्यालयाला त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सागर बन्सोड यांनी केले आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक डॉ.विनिता व्यास व सहाय्यक वनसंरक्षक गोविंदा लुचे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक वाय. बी. पाटील, वनरक्षक विठ्ठल सोटगीर, रोशन परतेती, मयुर पंचबुद्धे, ईमरत टेकाम, सतीष मसराम व पथकाने केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.