कन्हान २८ : – अंगणवाडी कर्मचारी संघटना नागपुर जिल्हा व्दारे रामटेक चे खासदार मा. श्यामकुमार बर्वे हयाना निवेदन देऊन फेस रिग्नीशन सिस्टीम पडताळ णी करतांना येणा-या समस्या अंगनवाडी कर्मचा-या पुढे आहे. यात लाभार्थ्यांचे आधार लिंक नसणे, मोबा ईल अनेकांकडे नसणे, मोबाईल नेटवर्क नसणे किंवा चेह-यातील बदलामुळे एफआरएस मध्ये वॅलीडेशन होण्यास प्रचंड अडचणी येतात. तरी अधिकारी वर्ग १००% वॅलीडेशन करिता दबाब टाकुन ते न झाल्यास कामावरून काढुन टाकण्याची धमकी देतात. करिता हा प्रश्न संसदेत लावुन धरण्याची विनती करण्यात आली.
अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नागपुर जिल्हा कमिटीच्या वतीने फेस रिग्नीशन सिस्टीम (एफआर एस) पडताळणी करतांना येणा-या समस्या त्यांच्या पुढे मांडल्या. लाभार्थ्यांकडे आधार लिंक नसलेले मोबाईल, अनेकांकडे मोबाईल नसणे, मोबाईल नेटवर्क नसणे किंवा चेह-यातील झालेल्या बदलामुळे एफआर एस मध्ये वॅलीडेशन होण्यात प्रचंड अडचणी येत आहे. असे असतांना अधिकारी वर्ग १००% वॅलीडेशन करि ता दबाब टाकुन ते न झाल्यास कामावरून काढुन टाकण्याची धमकी देतात. अशा धमक्यामुळे एक सेवि का ह्रुदयआघाताच्या धक्क्यामुळे मुत्यु झाला. वॅलीडे शन न झालेल्या लाभार्थ्याना टेक होम रेशन (टीएच आर) पासुन वंचित ठेवण्याचे कारस्थान रचले जात आहे. तसेच हया कृतीने अन्न सुरक्षा कायद्याचे व आधार विषयक सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयांचे सरळ, सरळ उल्लंघन केले जात आहे. करिता खासदार साहे ब आपण हा प्रश्न संसदेत लावुन धरावा. अशी विनंती संघटनेच्या शिष्टमंडळाने केली. यावेळी शिष्टमंडळात काॅ. शशी काळे, काॅ. विठ्ठल जुनघरे, काॅ. मनिषा बेले, काॅ. प्रिती पराते, काॅ. सुनिता मारबते व पालका तर्फे प्रशांत मसार, राजु पोटभरे, सुनंदा ढोले, सुजाता वासे, रेखा बावणकर, सुवर्णा शिंदे आदी प्रामुख्याने उपस्थि त होते.




