चंद्रपूर :- जलनगर वार्ड चंद्रपूर येथील मुद्रांक (स्टॅम्प) पेपर विक्रेता यांनी २०००/- रूपयाच्या मुद्रांक (स्टॅम्प) पेपर्सवर लाच रक्कम मागणी करून स्विकारल्याने अॅन्टी करप्शन ब्युरो चंद्रपूर यांचे पथकाने दि. ३१/१०/२०२५ रोजी कार्यवाही केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार हे चंद्रपूर येथील रहिवासी असून त्यांना विज टेंडर कामाकरीता ५०० /- रूपयाचे ०३ मुद्रांक पेपर्स व १००/- रूपयाचे ०५ मुद्रांक पेपर्स असे एकुण २०००/- रूपयाचे मुद्रांक पेपर्सची आवश्यकता असल्याने प्रत्येक ५०० रूपयाचे मुद्रांक पेपर्सवर ३०/- रू. असे ३ पेपर्सचे ९०/- रूपये व प्रत्येक १००/-रूपयाचे मुद्रांक पेपर्सवर १०/- रूपये असे ५ पेपर्सचे ५०/- रूपये असे एकुण १४०/- रूपये जादा मागणी करून, २०००/-रू. शासकीय शुल्काव्यतिरिक्त लाच रक्कम म्हणून स्विकारली. त्यानंतर अॅन्टी करप्शन ब्युरो (ACB) कडे तक्रार दाखल करण्यात आली व त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. पुढील तपास याबाबत सुरु असून एका महीला सहयोगीला ला ही लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर च्या पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक निलेश उरकुडे यांच्या टीमने सापळा रचून केली आहे.



